Shivajirao Patil : 'कुणाला कुठली जागा हे फायनल नाही', शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिक्रिया

शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे सोडले तर महायुती मध्ये आद्याप उमेदवार भेटायला नाही.
Published by :
Dhanshree Shintre

शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे सोडले तर महायुती मध्ये आद्याप उमेदवार भेटायला नाही. शरद पवार गटाची जागा कोणाला जाणार हे देखील अद्याप निश्चित नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची मोठी गोची झालेली पाहायला मिळते. प्रामुख्याने या जागेवर शिंदे गट व अजित पवार गट यांनी दावा केला असून शिंदे गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे इच्छुक आहेत. परंतु हि जागा जर अजित पवार गटाला गेली तर ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांनी आज तातडीची कार्यकरता मिटींग बोलवली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com