Ajit Pawar : आता वडिलांच्या नावाआधी आईचं नाव; अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

पुढील काळात नावामध्ये वडिलांसोबत आईच्या नावाचाही उल्लेख होणार आहे,असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.
Published by :
Team Lokshahi

पुढील काळात नावामध्ये वडिलांसोबत आईच्या नावाचाही उल्लेख होणार आहे,असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. स्वत:चे नाव त्यानंतर आई मग वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव अशा पद्धतीने नाव लिहिण्याची पद्धत सुरू होणार आहे. तसा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. बारामतीमधील सरपंच-उपसरपंच मेळाव्यात बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे. पुरुषांसोबत महिलांनाही समान अधिकार मिळावा यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com