आमदार संदीप क्षीरसागर यांना ओबीसींचा विरोध; बीडमधील हिंगणी खुर्दमध्ये क्षीरसागर यांना रोखलं

आमदार संदीप क्षीरसागर यांना ओबीसींचा विरोध पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आमदार संदीप क्षीरसागर यांना ओबीसींचा विरोध पाहायला मिळत आहे. बीडमधील हिंगणी खुर्दमध्ये क्षीरसागर यांना रोखलं असल्याची माहिती मिळत आहे. मराठा समाजाकडून राजकीय पुढार्‍यांना गाव बंदी करण्यात आली होती. आता अशाच पद्धतीने ओबीसी समाजाकडून गावबंदी करण्याच्या निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर हिंगणी खुर्द गावात आले असता मुंडे समर्थकांनी त्यांच्या गाडीच्या समोर घोषणाबाजी केली आणि त्यांना रोखलं. यावेळी ओबीसी समाजाकडून पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com