Video : बीडमध्ये नवरात्र महोत्सवात पुन्हा अश्लील नृत्य; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

Video : बीडमध्ये नवरात्र महोत्सवात पुन्हा अश्लील नृत्य; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

नवरात्र उत्सवातील लावणी कार्यक्रमामुळे बीड चर्चेत

विकास माने | बीड : सध्या बीड कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत आहे. गणेशोत्सवानंतर आता नवरात्र उत्सवातील लावणी कार्यक्रमामुळे बीड वादात सापडले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित लावणी महोत्सवात अश्लील नृत्य पाहायला मिळाले आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता.

बीडच्या परळीमध्ये संत भगवान बाबा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांनी सार्वजनिक दुर्गा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवानिमित्त सिने अभिनेत्री तेजश्री प्रधानला बोलावण्यात आलं होते. त्यामुळे तेजश्री प्रधानला पाहण्यासाठी परळीकरांनी मोठी गर्दी केली होती. तसेच, याठिकाणी लावणी महोत्सवाही आयोजित करण्यात आला होता. परंतु, या लावणी महोत्सवात अश्लील नृत्य पाहायला मिळाली. यादरम्यान तरुणांनी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. यावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानचा गणेशोत्सवातही पहिल्या दिवशी अश्लील नृत्य आणि लावण्या सादर करण्यात आल्या होत्या. यादरम्यान काही हुल्लडबाज तरुणांनी खुर्च्या डोक्यावर घेत खुर्च्याची तोडफोड केली. यामुळे टीकेची झोड उठली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com