Goat Emotional video : आई गं शेवटी जीव तो! चक्क माणसारखा गळ्यात पडून ढसाढसा रडला; ईदच्या दिवशी रडणाऱ्या बकऱ्याचा Viral Video
सध्या सगळीकडे बकरी ईदचा उत्साह आहे. या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकऱ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते आहे. त्यातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. एका मालकाने बकरी विक्रीसाठी आणली आणि तिचा व्यवहारही केला. त्याचवेळी या बकऱ्याला अश्रू अनावर झाले अन् तो मालकाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली.
हा व्हिडीओ पाहून, अनेकजण हळवे होत आहेत. एकदा का कुणाचाही लळा लागला, आणि कोणत्याही कारणाने ताटातूट होत असेल तर, तुमच्या आमच्या मनाला ती गोष्ट लागते. आपण अशावेळी भावविवश होतो. त्याला प्राणीही अपवाद नाही.
माणसांप्रमाणेच प्राण्यांना सुद्धा भावना असतात आणि ते सुद्धा भावूक होऊन रडतात. रडणाऱ्या बकऱ्याचा हा व्हिडिओ बकरी ईदशी संबंध असल्याचे म्हणत व्हायरल होत आहे. या बकरी ईदला मालक बकरा विकण्यासाठी आल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मालकाने करार केला तेव्हा बकरा मालकाच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागला.