Solapur : चालक संपामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद

ट्रक चालकांच्या संपाचा सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिणाम जाणवतो आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव आज बंद राहणार आहे.
Published by :
Team Lokshahi

ट्रक चालकांच्या संपाचा सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिणाम जाणवतो आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव आज बंद राहणार आहे. लिलाव आज बंद असल्याने सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटलेली आहे. काल उशिरा लोडींग झाल्याने कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय झालेला होता. सुदैवाने संप मागे घेतल्याची घोषणा झाल्याने उद्या बाजार मात्र सुरू राहतील. केंद्र सरकारच्या नव्या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी तीव्र विरोध करत काम बंद आंदोलन पुकारले होते. ट्रक चालकांच्या या आंदोलनाला यश आले असून ट्रक चालक संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत तूर्तास या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com