व्हिडिओ
Mumbai Police : मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट; पोलिसांकडून 5836 वाहनांची तपासणी
मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट मिशन: अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मध्यरात्री राबवलेले मिशन, 5836 वाहनांची तपासणी, 207 ठिकाणी शोध मोहिम.
आगामी अधिवेशन तसेच शहारातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री शहरात ऑपरेशन ऑलआऊट मिशन राबवले आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री सर्वत्र ऑपरेशन ऑल आऊट राबवले. पोलिसांकडून आतापर्यत 5836 वाहनांची तपासणी केली आहे. शहारातील 207 ठिकाणी शोध मोहिम राबवण्यात आली. अंमली पदार्थ खरेदी/विक्री करणाऱ्या गुन्हेगारावर 15 गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकुण 16 जणांवर कारवाई करण्याच आली आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व मुंबई पोलीस ठाण्यात ही कारवाई पार पाडली.