Sambhaji Bhide : संभाजी भिडेंविरोधात विरोधक आक्रमक; महिलांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन

संभाजी भिडेंनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाणार आहे.

पुणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणात त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झालेले आहेत. पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं निषेध आंदोलन होत आहे. संभाजी भिडेंनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाणार आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार बालगंधर्व चौकात तर काँग्रेसचं कसबा पेठेतील फडके हौद चौकात आंदोलन होणार आहे. संभाजी भिडेंनी महिलांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणात महाविकास आघाडीतील दोन्ही पक्ष पुण्यात आंदोलन करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com