विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. सकाळी ११ वाजता विधानसभा कामकाज होणार सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन सुरु झालेलं पाहायला मिळत आहे. पावसाळी अधिवेशनाआधी विरोधक आक्रमक झाले आहेत.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन घोषणाबाजी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या कर्जामाफीसाठी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com