Pakistani Girl Dance Video
Pakistani Girl Dance VideoTeam Lokshahi

Video : या तरुणीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल

सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. दररोज नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. दररोज नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पाकिस्तानी तरुणी लतादीदींच्या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहे.

Pakistani Girl Dance Video
VIDEO: अमेरिकेत एअर शो दरम्यान भीषण अपघात, दोन विमाने एकमेकांना धडकली

व्हायरल झालेला व्हिडीओ एका लग्न समारंभातील असल्याचं दिसून येत आहे. या समारंभात लता मंगेशकर यांच्या मेरा दिल ये पुकारे आजा गाण्यावर पाकिस्तानी तरुणी डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. व्हिडीओमध्ये डान्स करणाऱ्या तरुणीचे नाव आयशा असल्याचं कळतंय.हा व्हिडिओ आधी टिक टॉकवर शेअर करण्यात आला आणि नंतर तो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला. व्हिडीओ पाहून नेटकरी आयशाचं कौतुक करीत आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com