Mauli Palkhi : माऊलींची पालखी जेजुरीतून वाल्हेकडे मार्गस्थ; पालखी आज वाल्हे गावात मुक्कामी असणार

माऊलींची पालखी जेजुरीतून वाल्हेकडे मार्गस्थ झालेली आहे. यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात पालखी रवाना झाल्याचं दिसत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

माऊलींची पालखी जेजुरीतून वाल्हेकडे मार्गस्थ झालेली आहे. यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात पालखी रवाना झाल्याचं दिसत आहे. सोन्याच्या जेजुरीतील मुक्कामानंतर पालखी मार्गस्थ झालेली आहे. पालखी आज वाल्हे गावात मुक्कामी असणार आहे आणि त्यानंतर ती पुढे मार्गस्थ होईल.

महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या सुवर्णनगरीतून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाल्हेकडे पहाटे 6 वाजता मार्गस्थ झाला आहे. सकाळी 8 वाजता हा सोहळा दौंडज खिंडीत न्याहारीसाठी विसावनार आहे. त्यापुढे आज माऊलींची पालखी महर्षी वाल्मिकी ऋषींच्या वाल्हे या गावात मुक्कामी असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com