Pen Drive Bomb | 'शिंदे, फडणवीसांना अडकवण्याचे आदेश'?, हायकोर्टात पेन ड्राईव्ह बॉम्बचा दावा

मुंबई उच्च न्यायालयात पेन ड्राईव्ह बॉम्ब प्रकरण; शिंदे आणि फडणवीस यांना अडकवण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा, तपास अधिकाऱ्यांकडून मोठा षडयंत्राचा आरोप.
Published by :
shweta walge

मुंबई उच्च न्यायालयात पेन ड्राईव्ह बॉम्बच्या माध्यमातून एक मोठा दावा समोर आला आहे. महाविकास आघाडीच्या काळातील तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक मोठे षडयंत्र रचल्याचा आरोप तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. पेन ड्राईव्हमध्ये या संदर्भातील एक स्टिंग ऑपरेशन असलेला व्हिडिओ आहे, ज्यात फडणवीस आणि शिंदे यांना अडकवण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. एसीपी पटेल यांनी या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा गंभीर दावा केला आहे. लोकशाही मराठीच्या हाती हा खळबळजनक व्हिडिओ आल्यानंतर या प्रकरणाला मोठी तर्कशास्त्र वळण मिळालं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com