व्हिडिओ
Maha Kumbh Mela : PM Narendra Modi कुंभमेळ्यात सहभागी होणार
महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती! प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या या धार्मिक मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मोदी ५ फेब्रुवारीला येणार.
प्रयागराजमधील संगमच्या पवित्र भूमीवर आयोजित जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा, महाकुंभ, सोमवार, १३ जानेवारी रोजी पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर स्नान उत्सवाने सुरू झाला. या महाकुंभमेळ्यासाठी देशविदेशांतून असंख्य साधुसंत भेट देण्यासाठी आले आहेत.
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळयाला सुरुवात झाली आहे. सुमारे 1 कोटी भाविकांनी गंगेत आतापर्यंत स्नान केलं आहे. दिवसेंदिवस महाकुंभाची शोभा आणखीन वाढत चालली आहे. महाकुंभात जगभरातील भावीक स्नानाचा लाभ घेत आहेत.
या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारीला कुंभमेळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान प्रयागराजला भेट देण्यास जाणार आहेत. महाकुंभमेळ्यामध्ये ते सहभागी होणार आहेत. नरेंद्र मोंदी कुंभमेळ्यात स्नान करुन ते दिल्ली विधानसभेच्या मतदान करण्यासाठी पुढे जातील.