Mahabaleshwar : महाबळेश्वरमधील पॉईट्स पर्यटकांनी हाऊसफुल

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असलेले महाबळेश्वर नाताळच्या सुट्टयांमुळे बहरले असून सर्वत्र झगमगाट पहायला मिळत आहे.
Published by :
Team Lokshahi

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असलेले महाबळेश्वर नाताळच्या सुट्टयांमुळे बहरले असून सर्वत्र झगमगाट पहायला मिळत आहे. शनिवार, रविवार आणि ख्रिसमसची जोडून सुट्टी आल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. महाबळेश्वर व पाचगणीच्या बाजारपेठेत खरेदीसाठी पर्यटक वाढू लागले आहे. तर कोरोनानंतर पुन्हा एकदा महाबळेश्वरमध्ये शालेय सहलींची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पर्यटकांबरोबरच विद्यार्थ्यांची गर्दी पहायला मिळत आहे. मेरी ख्रिसमस... म्हणत नाताळच्या प्रमुख हंगामासाठी महाबळेश्वर बहरले आहे. दिवाळी हंगामानंतर आता प्रमुख हंगाम म्हणून नाताळ हंगाम ओळखला जातो. नाताळसह नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. नाताळसाठी एक दोन महिने आधीच हॉटेल लॉजिंगसह बंगले आरक्षित झालेले आहे. हॉटेल व्यावसायिकांसह बाजारपेठेतील व्यापारी वर्ग पर्यटनास येणाऱ्या विविध खाद्यपदार्थांवर ताव मारला जातो आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com