New India Co-operative Bank: न्यू इंडिया बँकेवर निर्बंध, राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध लावले. आशिष शेलार आणि सुप्रिया सुळेंच्या प्रतिक्रियांसह अधिक माहिती मिळवा.
Published by :
Prachi Nate

मुंबईमधील अंधेर येथील न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लावले आहेत. याबद्दलचे आदेश गुरुवारी बँकेला देण्यात आले. या आदेशांनुसार बँक पुढील सहा महीने कर्ज देऊ शकणार नाही. तसेच पैसे काढू शकणार नाहीत आणि खात्यावर भरूही शकणार नाहीत. या सगळ्या प्रकारानंतर ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. याचपार्श्वभूमिवर राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान भाजपचे आशिष शेलार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी यादरम्यान आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नियम आणि कायद्याच्या चौकटीत कारवाई केली आहे- आशिष शेलार

आशिष शेलार म्हणाले की, आरबीआयने जी कारवाई केली असेल, ती कारवाई आरबीआयच्या नियम आणि कायद्याच्या चौकटीत कारवाई केली आहे. आरबीआयच्या कारवाईमुळे अजून लोकांचे पैसे सुरक्षित राहावे, या दृष्टिकोनातून ही कारवाई केली आहे. मला वाटत या विषयामध्ये केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री चर्चा करून सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहतील, लोकांना पैसे परत मिळतील याची काळजी घेतील, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे.

अमित शाह यांच्याशी चर्चा करणार- सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बॅंकचं असं काही होण खुप वाईट आहे कारण त्यात एक गरीब फसला जातो. गरीब त्यांचे पैसे बॅंकमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी जमा करतात आणि अस काही झालं तर त्यांच मोठ नुकसान होत. मी सहकार मंत्री अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांच्याशी स्वत बोलणार आहे आणि या प्रकरणी तोडगा काढावा अशी विनंती करणार आहे. मागे देखील पीएनबी बँकेत घोटाळा झाला होता सर्वसामान्य नागरिक भरडले जातायत. यावर योग्य तो मार्ग निघावा यासाठी स्वत प्रयत्न करणार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com