Saif Ali Khan Seizure Property: सैफ अली खानच्या कुटुंबीयांची भोपाळमधील संपत्ती जप्त होण्याची शक्यता?

सैफ अली खानच्या कुटुंबीयांची भोपाळमधील 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त होण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने अपील प्राधिकरणासमोर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Published by :
Team Lokshahi

सैफच्या कुटुंबीयांची 15 हजार कोटी रुपयांची भोपाळ मधली संपत्ती जप्त होण्याची शक्यता आहे. सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांच्या कुटुंबाची भोपाळमधील कोहेफिजा ते चिक्लोडपर्यंत १०० एकर मालमत्ता पसरलेली आहे.

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने अभिनेता सैफ अली खान, त्याची आई शर्मिला टागोर, बहिण सोहा आणि सबा अली खान तसेच पतौडीची बहीण सबिहा सुलतान यांना शत्रू मालमत्ता प्रकरणात आपले अपील प्राधिकरणासमोर ठेवण्याचे आदेश दिले होते. पतोडी कुटुंबीयांच्या या मालमत्तेवर दीड लाख लोकांनी अतिक्रमण केलेले आहे.

30 दिवसांच्या मुदतीत त्यांना आपले म्हणणे मांडायचे होते. मात्र, अद्याप कोणता पाठपुरावा झाला नसल्याने सैफची मालमत्ता आणि आलिशान घर पतौडी पॅलेस जे १९६८ च्या शत्रू विवाद कायद्यांतर्गत येते. अशा संपत्तीवर कोणीही आपला हक्क सांगू शकत नाही. पतोडे घराण्याच्या मालमात्तेवरील २०१५ पासून असलेली स्थगिती रद्द करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com