Praja Foundation Report : ‘मविआ’चे आमदार अव्वल; प्रजा फाऊण्डेशनचा अहवाल
मुंबईतील मविआ आमदारांची विधीमंडळामध्ये अव्वल कामगिरी पाहायला मिळाली आहे. प्रजा फाऊण्डेशनच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. आमदार अमीन पटेल, सुनिल प्रभू यांची कामगिरी सर्वोत्तम असल्याच दिसून आलं आहे. विरोधी पक्षामध्ये असलेले मविआचे जे आमदार आहेत त्यांची कामगिरी या टर्ममध्ये चांगली राहिल्याचं समोर आलं आहे. पक्षाच्या कामगिरीमध्ये कॉंग्रेस पक्षाची कामगिरी चांगली असल्याचं समोर आलं आहे.
कॉंग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत, लोकप्रतिनीधी आहेत त्यांनी राज्यामध्ये चांगली कामगिरी केल्याचं समोर आलं आहे. आमदार राम कदम आणि दिलीप लांडे हे शेवटच्या क्रमांकावर असल्याची माहिती मिळाली आहे. आमदारांची अधिवेशनातील उपस्थिती, मांडलेल्या समस्या, विचारलेले प्रश्न या आधारे केलेल्या मुंबईतील मूल्यमापनात मविआचे आमदार अव्वल ठरले आहेत. शेवटच्या तीन क्रमांकावर महायुतीचे आमदार आहेत.