Prajakta Pillewan: प्राजक्ता पिल्लेवान यांनी अमरावती लोकसभेतून घेतली माघार

महाराष्ट्राच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमरावती लोकसभेतून आता वंचितचे उमेदवार माघे फिरत आहेत.

महाराष्ट्राच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमरावती येथील वंचितने घोषणा केलेल्या प्राजक्ता पिल्लेवान उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. प्राजक्ता पिल्लेवान यांना वंचितकडून अमरावतीतून उमेदवारी सुरुवातीला जाहीर करण्यात आली होती. काही वेळातच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

अमरावती लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अशातच अमरावतीत वंचित बहुजन आघाडीतून कोण निवडणूक लढवणार हे पाहायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमधून वंचित यांनी जाहीर केल्यानुसार प्राजक्ता पिल्लेवान उमेदवारी दाखल करणार नाहीत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com