Prakash Ambedkar : जेवणात जुलाबाचे औषध टाकलं जाऊ शकतं, जरांगे पाटलांना सावध राहण्याचा सल्ला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या वेशीपर्यंत आला आहे. अशातच, प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या वेशीपर्यंत आला आहे. अवघ्या काही तासांत ते मुंबईत दाखल होणार आहेत. अशातच, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. मनोज जरांगे पाटलांच्या जेवणात जुलाबाचे औषध टाकलं जाऊ शकतं, त्यामुळे त्यांनी चार जणांमध्ये जेवण न करता पंगतीत जेवण करावं, त्यामुळे त्यांनी काळजी घ्यावी. राजकारणात काहीही होऊ शकते, असा सल्ला आंबेडकरांनी जरांगे पाटलांना दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com