ISRO | Prayagraj | इस्त्रोने जारी केले महाकुंभमेळयाचे फोटोज!

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याचे इस्रोच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो जारी केले आहेत. अंतराळातून कसे दिसते प्रयागराज, ते पाहा!
Published by :
shweta walge

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची इस्रोच्या सॅटेलाईटने अंतराळातून फोटो टिपले आहेत.ते फोटो इस्रोनं आता जारी केलेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा होत आहे. कोट्यवधी भाविक कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रयागराजमध्ये आले असूनू, गर्दीने नदीकाठ आणि शहर फुलून गेले आहे. महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने भाविकांचा जनसागर उसळलेले प्रयागराज अंतराळातून कसे दिसते, याचे आता फोटोही समोर आले आहेत. ४५ दिवस चालणाऱ्या कुंभमेळ्याचे इस्रोच्या सॅटेलाईटने फोटो घेतले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com