मुंबईसह उपनगरांत पावसाची हजेरी

मुंबईसह परिसरात पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत.

मुंबई : मुंबईसह परिसरात पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे हवा प्रदूषणाने त्रस्त मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे लोकल वाहतुकीलाही फटका बसल्याची माहिती आहे. घाटकोपर, अंधेरीत पावसाच्या हलक्या सरी तर ठाणे, नवी मुंबई, रायगड, परभणीत पाऊस पडला आहे. पुढील 3-4 दिवस राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com