व्हिडिओ
PM Narendra Modi On Waqf Board : पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका करता म्हणाले की, कॉंग्रेसने केवळ...
पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसच्या वक्फ कायद्याच्या धोरणांवर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सोमवारी हरियाणातील हिसार ते अयोध्या दरम्यानच्या विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवला. तसेच यांच्या हस्ते हिसारच्या महाराजा अग्रसेन विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणीदेखील झाली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका केली.
पीएम मोदी म्हणाले की, "कॉंग्रेसने केवळ काही कट्टरपंथियांना खूश केले. उर्वरित समाज, मागास, अशिक्षित आणि गरीब राहिला. कॉंग्रेसच्या या वाईट धोरणाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे वक्फ कायदा आहे" पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.