व्हिडिओ
Priyanka Gandhi Loksabha Seat | प्रियंका गांधी यांच्या आसनव्यवस्थेत बदल, चौथ्या रांगेत स्थान
प्रियंका गांधी वड्रा यांना संसदेत चौथ्या रांगेत स्थान, हिवाळी अधिवेशनात बसण्याची व्यवस्था निश्चित.
संसदेचे हिवाळी अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी 18व्या लोकसभेच्या सभागृहात कोण कुठे बसणार याची व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची भूमिका आणि ज्येष्ठता स्पष्टपणे दिसून येते. नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मध्यवर्ती स्थान मिळाले आहे, तर पहिल्यांदाच संसदेत पोहोचलेल्या प्रियंका गांधी वड्रा यांना चौथ्या रांगेत स्थान देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीट क्रमांक १ वर स्थान देण्यात आले आहे. काँग्रेस नेते आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सीट क्रमांक ४९८ वर बसतील, तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना ३५५ जागा आणि तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील नेते सुदीप बंदोपाध्याय यांना ३५४ जागा देण्यात आली आहे.