पिंपरी चिंचवडचा करोडपती PSI निलंबित; वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहोचवल्याचा ठपका

पिंपरी चिंचवडचा करोडपती PSI निलंबित; वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहोचवल्याचा ठपका

पिंपरी चिंचवडमधील करोडपती पीएसआय सोमनाथ झेंडेंना अखेर निलंबित करण्यात आलेलं आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील करोडपती पीएसआय सोमनाथ झेंडेंना अखेर निलंबित करण्यात आलेलं आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आला आहे. परंतु विभागीय चौकशीत त्यांना स्वतःचं म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे.

क्रिकेट वल्ड कप मॅचवेळी झेंडेंनी ड्रीम 11 या ऑनलाइन गेममध्ये त्यांनी स्वतःची टीम लावली अन त्यात ती अव्वल ठरली. त्यामुळे झेंडे अवघ्या आठ तासांत करोडपती झाले. दीड कोटींची त्यांना लॉटरी लागल्यानं त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याच आनंदाच्या भरात झेंडेंनी वर्दीत माध्यमांना मुलाखती दिल्या अन हीच चूक त्या आनंदावर पाणी फेरणारी ठरली.

पिंपरी चिंचवड पोलिसांनीच त्याची चौकशी केली अन यात त्यांचं निलंबन करण्यात आलं. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून आता पुढं विभागीय चौकशी होईल त्यात त्यांना स्वतःच म्हणणं मांडता येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com