Nilesh Chavan : निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल असताना पोलिसांकडून शस्त्रपरवाना
निलेश चव्हाणवर जून 2022मध्ये गुन्हा दाखल असूनही जालिंदर सुपेकर तत्कालीन पुण्याचे अतिरिक्त आयुक्त असताना त्यांनी निलेश चव्हाणला नोव्हेंबर 2022 साली शस्त्रपरवाना दिला. त्यामुळे निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल असताना शस्त्र परवाना देण्यासाठी जालिंदर सुपेकरांवर असा कोणता दबाव होता असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
त्यापूर्वी ग्रामीण पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निलेश चव्हाणला परवाना नाकारला होता. त्यावेळी शशांक हगवणे आणि सुशील हगवणेलाही शस्त्र परवाना देण्यात आल्याचीही माहिती समोर येते आहे. जालिंदर सुपेकर हे राजेंद्र हगवणेचे नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे.
त्यामुळे राजेंद्र हगवणेनं जालिंदर सुपेकरांकडून निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळवून दिला का? असा सवालही उपस्थित होतो आहे. आता याप्रकरणी पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकरांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होतो आहे. कस्पटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचा निलेश चव्हाणवर आरोप आहे.