Pune : पुणे पोलिसांकडून दिल्लीत 600 किलो ड्रग्ज जप्त

पुणे पोलिसांनी केलेल्या अत्यंत वेगवान हालचालींमुळे देशभरात आणि परदेशात स्मगलिंगसाठी चाललेलं १६०० किलो मेफोड्रेन पुणे पोलिसांनी तब्बल ६ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून जप्त केले आहे.
Published by :
Team Lokshahi

पुणे पोलिसांनी केलेल्या अत्यंत वेगवान हालचालींमुळे देशभरात आणि परदेशात स्मगलिंगसाठी चाललेलं १६०० किलो मेफोड्रेन पुणे पोलिसांनी तब्बल ६ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या १० टीम्स या दौंड कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम कंपनीत , दिल्लीत , कराड , सांगली , बेंगलोर या भागात छापेमारी करत होत्या. शुक्रवारी एक किलो एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार सुरु केलेल्या तपासात अत्यंत वेगवान तपास करून मीठाची वाहतूक करतोय असं समजून ट्रान्सपोर्ट करणाऱ्या तीन टेम्पोचालकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि ड्रग्जच आंतरराष्ट्रीय रॅकेट पोलिसांच्या हाती लागलं.

तब्बल १६०० किलो मेफोड्रेन पोलिसांनी जप्त केलय ज्यात ९०० किलो एमडी दिल्लीत देशांबरोबर तस्करीसाठी नेत असताना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. तर तब्बल साडेसहाशे किलो एमडी हे कुरकुंभच्या एमआयडीसीतील अर्थकेम या कंपनीतून जप्त करण्यात आलं आहे.

आतापर्यंत या प्रकरणात पुण्यातून हैदर शेख आणि वैभव माने नावाच्या आरोपी सह आणखी एक जण तर दिल्लीतून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात परदेशी नागरिक असलेल्या दोन जणांचा शोध सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com