Punit Balan: पुनीत बालन यांनी सपत्नीक केलं मतदान, नागरिकांनाही केलं मतदान करण्याचे आवाहन

पुण्यातील उद्योगपती आणि गणेश मंडळाच्या आधारस्तंभ पुनीत बालन आणि सौभाग्यवती जानवी धारिवाल बालन यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
Published by :
Sakshi Patil

चंद्रशेखर भांगे, पुणे

पुण्यातील उद्योगपती आणि गणेश मंडळाच्या आधारस्तंभ पुनीत बालन आणि सौभाग्यवती जानवी धारिवाल बालन यांनी आज पुण्यातील कोरेगाव पार्क येथे असलेल्या कस्तुरबा गांधी या ठिकाणच्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

शहराच्या आणि देशाच्या विकासासाठी आज मी या ठिकाणी येवून मतदान केलं आहे. ज्यांनी आतापर्यंत मतदान केलं नाही त्या सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान करावे, असं पुनीत बालन म्हणाले

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com