Purush Marathi Play | मराठी रंगभूमी गाजवलेलं नाटक 40 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी रंगभूमीवरचं सर्वात गाजलेलं नाटक 'पुरुष' ४२ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शरद पोंक्षे आणि स्पृहा जोशी यांच्या प्रमुख भूमिकेत हे नाटक १४ डिसेंबर रोजी सादर होणार आहे.
Published by :
shweta walge

मराठी रंगभूमीवरचं सर्वात गाजलेलं नाटक 'पुरुष' आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाना पाटेकरांच्या अभिनयाने नटलेलं नाटक आता एका नवीन टीमसोबत मराठी रंगभूमीवर येणार आहे.

शरद पोंक्षे 'पुरुष' नाटकात प्रमुख भूमिका साकारणार असून तब्बल ४२ वर्षानी हे नाटक प्रेक्षकांना पाहिला मिळणार आहे... स्त्री पुरुष संबंध सामाजिक विषमता आणि स्त्रीच्या संघर्षाची कहाणी या नाटकातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या १४ डिसेंबर रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे.राजन ताम्हाणे दिग्दर्शित, जयवंत दळवी लिखित य नाटकाचे शरद पोंक्षे, श्रीकांत तटकरे, समिता भर काणेकर निर्माते आहेत. या नाटकात स्पृहा जोश अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत दिसतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com