Rahul Narvekar : आता राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणावर घेणार मॅरेथॉन सुनावणी

राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल जाहीर केला होता. यानंतर आता राष्ट्रवादी अपात्रतेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल जाहीर केला होता. यानंतर आता राष्ट्रवादी अपात्रतेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. याप्रकरणी आता राहुल नार्वेकर आता मॅरेथॉन सुनावणी घेणार आहेत.

राहुल नार्वेकरांनी आज पहाटे मुंबई मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, येत्या 20 ते 25 जानेवारीला राष्ट्रवादी अपात्रतेसंदर्भातसुद्धा सुनावणी होणार आहे. यादरम्यान छगन भुजबळ, अनिल पाटील यांची फेरसाक्ष होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com