Rahul Narvekar| राहुल नार्वेकर यांचा उध्दव ठाकरेंना सणसणीत टोला

देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या नेमणुकीवरुन उध्दव ठाकरेंनी टीका केली आहे. या टीकेला आता राहुल नार्वेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नेमणूक हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का? असा सवाल उध्दव ठाकरेंनी केला आहे. यावर आता नार्वेकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांचे माझ्यावरील प्रेम जग जाहीर आहे. त्यांच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो. या समितीमध्ये आपल्या राज्यातील सदस्य आहे ही अभिमानाची बाब पाहेन. त्यांना आपल्या राज्याबद्दल अस्मिता नसावी, अशी टीका नार्वेकरांनी उध्दव ठाकरेंवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com