Rahul Solapurkar : कोरोनातील टाळ, थाळीनाद कोरोनातील 'तो' थाळीनाद रामलल्लाच्या मूर्तीसाठी

कोरोना काळात देशभरात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी झालेल्या थाळीनाद, घंटानादाबाबत अभिनेते राहुल सोलापूरकरांनी खळबळजनक दावा केला आहे.
Published by :
Team Lokshahi

कोरोना काळात देशभरात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी झालेल्या थाळीनाद, घंटानादाबाबत अभिनेते राहुल सोलापूरकरांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनात पंतप्रधान मोदींनी जनतेला थाळीनाद करून भारतीयांना एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी देशात आणखी एक घडामोड सुरू होती, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी पुण्यातील भाषणात केला आहे. हा थाळीनाद रामलल्लांची मूर्ती मंदिरात नेण्यासाठी असल्याचा दावा राहुल सोलापूरकरांनी केला आहे. संपूर्ण देशभरात थाळीनाद, घंटानाद सुरू असताना योगी आदित्यनाथ रामलल्लाची मूर्ती घेऊन अयोध्देच्या मंदिराकडे जात होते. पंतप्रधान मोदींनीच ही शक्कल लढवली होती, असा दावा सोलापूरकरांनी केला आहे. राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com