Raj Thackeray | टोल नाक्यावर वाहतूक कोंडी, राज ठाकरे स्वत: उतरले गाडीच्या खाली

राज ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोलनाक्यावर गाड्या टोलवर तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या.

पिंपरी-चिचंवड : येथील शंभरावा अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हजेरी लावली होती. यानंतर राज ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोलनाक्यावर गाड्या टोलवर तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. यावेळी राज ठाकरे स्वतः गाडीतून उतरले आणि गाड्यांना वाट करून दिली. ट्रॅफिकमध्ये असलेल्या रुग्णवाहिकेला देखील राज ठाकरे यांनी रस्ता करुन दिला. तसेच, राज ठाकरेंनी टोल अधिकाऱ्यांना दमही दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com