व्हिडिओ
Raj Thackeray On Sanjay Nirupam : 'राज ठाकरे कधी कुणाला पाठिंबा देतील आणि कधी काढून घेतील याचा नेम नाही'- निरुपम
राज ठाकरे यांची भूमिका अनिश्चित, संजय निरुपम यांची टीका
शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी मनसेला खोचक सल्ला दिलेला आहे. मनसेने मराठी लर्निंग क्लासेस सुरु केले पाहिजेत. जे नुकतेच महाराष्ट्रात आले आहेत त्यांना मराठी शिकू द्या. राज ठाकरे कधी कोणाला पाठिंबा देतील आणि कधी कोणाचा पाठिंबा काढून घेतील हे त्यांच त्यांनाच माहित नसत. भाजपने मनसेकडे जास्त लक्ष देऊ नये असं संजय निरुपम म्हणाले आहेत.
पुढे संजय निरुपम म्हणाले की, "बिल्डिंगमध्ये काम करणाला वॉचमन आहे, त्याला तुम्ही कानफाटात मारता. पुढे त्याला तुम्ही सांगता की, तु मराठी बोल. त्याला मराठी येत नाही तो कसं बोलेल. बोलायला पाहिजे, पण त्याला तो वेळ द्या ना. तुम्हाला जर एवढाच जोष आहे, उत्साह आहे, तर तुम्ही मराठी लर्निंग क्लासेस सुरु करा".