Haribhau Bagde : राजस्थानचे राजपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात, थोडक्यात बचावला जीव

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाडामुळे अपघात, सुदैवाने ते सुखरूप
Published by :
Prachi Nate

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे शनिवारी पाली येथे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आले होते. त्यावेळी एक दुर्घटना घडता घडता टळली आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरचा शनिवारी तांत्रिक बिघाडामुळे पाली येथे अपघात झाला. सुदैवाने बागडे त्या हेलिकॉप्टरमध्ये नसल्यामुळे ते सुखरूप आहेत.

ते हेलिकॉप्टरमधून दुपारी अजमेर येथून पाली येथील शासकीय कन्या महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर पोहोचले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर ते जिल्हा परिषदेच्या सभागृहातील नियोजित कार्यक्रमाला भेट देण्यासाठी गेले. त्यानंतर कन्या विद्यालयाच्या हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने जयपूरला परत जाताना त्यांच्या हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण भरले.

अचानक हेलिकॉप्टरच्या पंख्यांत स्फोट झाला आणि धूर निघू लागला. तेव्हा हेलिकॉप्टर जेमतेम १० फूटच उडालेले होते. हेलिकॉप्टर वर उडण्याऐवजी जागेवरच गिरक्या घालत होते. दुर्घटना घडली तेव्हा राज्यपाल बागडे हेलिकॉप्टरमध्ये नव्हते. ते नियोजित कार्यक्रमानुसार रस्तामार्गे आधीच सोनाणाकडे निघून गेले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com