खासदार राजेंद्र गावित यांनी घेतली अमित शाहांची भेट

वसई विरार मेट्रोसाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट, अमित शाह सकारात्मक
Published by :
Team Lokshahi

विरार: मीरा भाईंदर पर्यंत आलेली मुंबई मेट्रो पुढे वसई - विरार पर्यंत मंजूर करत वसई विरार मेट्रो कॉरिडॉर मंजूर केला जावा यासाठी मागणी वाढत आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित व वसई विरार परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष मयुरेश वाघ यांनी याबाबत आज केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि त्यांना विरार मेट्रो बाबत साकडे घातले. केंद्र व राज्य सरकार मिळून लवकरात लवकर वसई विरार मेट्रो कॉरिडॉर मंजूर करावा अशी विनंती करण्यात आली आहे.

याबाबत अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व शहरी विकास मंत्रालय मेट्रोचा प्रस्ताव जेव्हा येईल तेव्हा या प्रस्तावाला नक्की मंजुरी देईल, असे आश्वासन यावेळी अमित शाह यांनी दिले. त्यामुळे नजीकच्या काळात वसई विरार मेट्रो मंजूर होई पर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार आहे, असे खासदार गावित व मेट्रो साठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते मयुरेश वाघ यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com