Raksha Bandhan 2024 : बाजारपेठेत राखी खरेदीसाठी महिलांची गर्दी

बहिण भावाच्या प्रेमळ नात्याचा ऋणानुबंध जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणाच्या निमित्ताने पैठणच्या बाजारपेठेत राखी खरेदीसाठी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे.
Published by :
Team Lokshahi

बहिण भावाच्या प्रेमळ नात्याचा ऋणानुबंध जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणाच्या निमित्ताने पैठणच्या बाजारपेठेत राखी खरेदीसाठी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. महिलांना या राख्या भुरळ पाडत आहेत.

या वेळेस महिलांना बाजारपेठेत होममेड राख्या खरेदी करायला मिळत आहेत. राख्यांचे भाव जरी वाढलेले असले तरी या महिला भावासाठी याठिकाणी राख्या घेण्यासाठी आल्या आहेत. यंदाची राखीपौर्णिमा महिला मोठ्या उत्साहात साजरी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com