Sanjay Raut on Devendra Fadnavis : हिट अँड रन प्रकरणावरून राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

मुंबई हिट अँड रन प्रकरणावरून राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मुंबई हिट अँड रन प्रकरणावरून राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस युजलेस गृहमंत्री असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. मुंबईत इतकी मोठी दुर्घटना घडूनही साधी सहवेदना व्यक्त नाही असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. फडणवीसांसारखा गृहमंत्री राज्याला मिळालाय हे दुर्दैव असंही संजय राऊत म्हणाले. गृहमंत्री नक्की कोणत्या दबावाखाली आहेत, तुमच्या पैशांची मस्ती जनता रस्त्यावर उतरवल्याशिवाय राहणार नाही असं राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com