Ravikant Tupkar Arrested : रविकांत तुपकर पोलिसांच्या 'ताब्यात; कारण काय?

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी 29 नोव्हेंबरला थेट मंत्रालयाचा ताबा घेण्याचा गंभीर इशारा दिलेला आहे.
Published by :
Team Lokshahi

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी 29 नोव्हेंबरला थेट मंत्रालयाचा ताबा घेण्याचा गंभीर इशारा दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. तर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी 24 नोव्हेंबर रोजी तुपकरांना नोटीस बजावली होती. आंदोलन करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असे नोटीसमध्ये नमूद होते. तर दुसरीकडे रविकांत तुपकर आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. आज 25 नोव्हेंबर रोजी शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर मोठा फौज फाटा घेऊन रविकांत तुपकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि आताच थोड्या वेळा पूर्वी पोलिसांनी तुपकर याना ताब्यात घेतले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com