रविकांत तुपकरांची तोफ पुन्हा धडाडणार! बुलढाण्यात आज एल्गार महामोर्चा; बळीराजाची फौज एकत्र येणार

उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. या लढ्याचा पहिला टप्पा म्हणजे ‘एल्गार महामोर्चा’ आहे.
Published by  :
Team Lokshahi

उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. या लढ्याचा पहिला टप्पा म्हणजे ‘एल्गार महामोर्चा’ आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात भव्य ‘एल्गार महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. आज शेतकऱ्यांचं वादळ बुलडाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. शहरातील जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथून दुपारी 12 वाजता या महामोर्चाची सुरुवात होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com