Ravindra Chavan: महायुती सरकारची वर्षपूर्ती; 'फडणवीस दूरदृष्टी असणारे नेते' - रवींद्र चव्हाण
महायुती सरकारला आज वर्ष पूर्ण झले आहे. देवेंद्र फडणवीस दूरदृष्टी असणारे नेते आहेत असं रवींद्र चव्हाण म्हणतायेत. राज्यात सरकारकडून गतिमान विकास सुरु आहे असेही रवींद्र चव्हाणांचे म्हणणे आहे. समृद्धी महामार्गामुळे विकासाला गती मिळाली असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे.
वाढवण बंदरामुळे रोजगार निर्मिती असं देखील रवींद्र चव्हाण म्हणतायेत. महायुती सरकारची आज वर्षपूर्ती आहे. त्यानिमित्ताने नुकतीच रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांच्या कार्याचं त्यांनी कौतुक केलंल आहे.
रवींद्र चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले, कशा पद्धतीने त्यामध्ये पुढे जाता येतं त्याची खरी सुरुवात जर कोणी केली असेल तर ते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्र जी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचा सरकार केला आहे असं मला सांगायला आनंद होतो. पायाभूत सुविधा या अधिक सक्षम झाल्या पाहिजेत, वाहतुकीच्या कोंडी या शहरांमधून संपल्या पाहिजेत. या सरकारच्या माध्यमातून काम मोठ्या प्रमाणात सुरु झालं आहे.
