Jalgaon News : जळगावात पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवरुन अपहरणाची घटना समोर आली आहे. अन्य गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिस गेले होते. आरोपीला पकडून घेण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गावकऱ्यांनी हल्ला केला. रागात असलेल्या गावकऱ्यांनी एका पोलिसाला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या पोलिसाला मध्यप्रदेश सीमेपलिकडील ऊमर्टी गावात घेऊन गेले. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
आता मध्यप्रदेश पोलिसांकडून अपहरण झालेल्या कर्मचाऱ्याला महाराष्ट्र पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की," मध्यप्रदेश राज्य हे आपल्या शेजारील राज्य आहे. सीमेलगतच्या ठिकाणी संशयास्पद आणि चुकीच्या गोष्टी सुरु असल्याचे पोलिसांना लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी सीमेलगत जाळं टाकत आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळस आरोपीनी पोलिसांवर हल्ला केला".
पुढे फडणवीस म्हणाले की, "एका पोलिस कर्मचाऱ्याला उचलून घेऊन गेले. पण पोलिसांनी आरोपीला पकडलं होतं. मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने अपहरण केलेल्या कर्मचाऱ्याला सोडवण्यात आले आहे. मध्यप्रदेश पोलिसांना सांगितले आहे की, सीमेलगतच्या गावामध्ये संशयास्पद आणि चुकीच्या गोष्टी होत आहेत त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. शस्त्र सीमेलगत बनतात ती महाराष्ट्रमध्ये येतात. यासर्व संदर्भाची माहितीची घेत आहोत". असं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.