Rohit Patil Exclusive UNCUT | आबांवरील टीकेनंतर रोहित पाटील आक्रमक, थेट दादांवर पलटवार | Lokshahi

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाचे उमेदवार रोहित पाटील महाराष्ट्रातील सर्वात तरूण उमेदवार ठरले आहेत. त्यांना वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे. रोहित पाटील हे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र आहेत. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे संजयकाका पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे. पक्ष फुटीनंतर मी त्यांच्या सोबत असतो तर त्यांनी हे विधान केलं असतं का? अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर रोहीत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Published by :
Team Lokshahi
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com