महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पाटील म्हणाले की, चर्चा केल्यानंतर त्यावर काही मार्ग निघेल. काही एकमेकांच्या बाबतीत गैरसमज असतील ते गैरसमज दूर होतील असा विश्वास आम्हाला सर्वांना आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचा उमेदवाराच्या पाठिशी तालुक्यातलं असतील किंवा जिल्ह्यातलं असतील, महाविकास आघाडीतलं घटक असतील ताकदीने उभे आहेत ते काम करत आहेत. त्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल याचा प्रयत्नसुद्धा आम्ही सगळे मिळून करतो आहे. असे रोहित पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com