Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार आणि अजित दादा गटामध्ये जुंपली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार सतत राज्य सरकारच्या कारभारावर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करत आहेत. अजित पवार गटाचे काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं आमदार रोहित पवार यांचा दावा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाबाबत मोठा दावा केला आहेत. अजित पवार गटाचे काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं रोहित पवार यांनी दावा केला आहे. 'भाजपचा नेत्यांना पक्षात ओढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे', असा दावा रोहित पवार यांचा आहे. शिंदेंच्या खासदारांचा भाजपच्या चिन्हावर लढण्याचं मत असल्याचं देखील रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. यावर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार गटातील नेते अजित पवार गटात येणार असल्याचे मिटकरींनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com