Rohit Shetty: रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरणी आरोपींना 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणातील आरोपींना कोर्टाने ११ फेब्रुवारीपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील आणि पोलिसांनी कोर्टासमोर सांगितले की, हे सर्व आरोपी शुभम लोणकरच्या सूचनेवर कार्यरत होते आणि त्यांचा मुख्य मास्टरमाइंड शुभम लोणकर असल्याचे धगर आहे.
पोलिसांनी कोर्टाला सांगितले की, आरोपी शुभम लोणकरच्या संपर्कात होते आणि गुन्हा करण्यासाठी सिग्नल अॅपचा वापर करत होते. गुन्हा उडाला आणि नंतर हे अॅप डिलिट केले गेले. शुभम लोणकरचा मागोवा घेण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडीची गरज असल्याचे सरकारी वकीलांनी कोर्टात नमूद केले. शुभम लोणकर हा बाबा सिद्दिकी हत्याकांडातील मुख्य आरोपी असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
तपासादरम्यान आरोपींच्या घरातून एक पिस्तूल, तीन मॅगझिन आणि एक एअर गन पोलिसांनी हस्तगत केली आहे. हे शस्त्रे गुन्ह्याशी संबंधित असल्याचे पोलिसांना संशय आहे. रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण गेल्या काही दिवसांत घडले असून, त्यामागे गुंडागर्दी आणि बदल्याची पार्श्वभूमी असल्याचे तपासात समोर येत आहे.
