Kolhapur : रुकडी ते कोल्हापूर रेल्वेमार्गावर आत्मक्लेश यात्रा! पोलिस आणि प्रवाशांमध्ये राडा

कोल्हापूरच्या रुकडी स्थानकात रेल्वे प्रवासी आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे.
Published by :
Team Lokshahi

कोल्हापूरच्या रुकडी स्थानकात रेल्वे प्रवासी आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे. प्रवाशांची रुकडी ते कोल्हापूर आत्मक्लेश पदयात्रा पोलिसांनी थांबवल्यांनं पोलीस आणि प्रवाशांत बाचाबाची झाली. महालक्ष्मी, कोयना, महाराष्ट्र आणि सह्याद्री एक्स्प्रेस या गाड्यांना पूर्वीप्रमाणे थांबे देण्याची मागणी करत प्रवाशांनी आंदोलन केलं होतं. मात्र रेल्वे पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com