Sachin Ahir: 'स्वबळावर लढायचं की नाही हे ठाकरे ठरवणार' - आहिर

सचिन अहिर यांनी सांगितले की, निवडणुका स्वबळावर लढायच्या की महाविकास आघाडी म्हणून, हे उद्धव ठाकरे 23 तारखेला ठरवणार आहेत.
Published by :
Prachi Nate

आगामी काळात होणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की महाविकास आघाडी म्हणून लढायच्या हे उद्धव ठाकरे 23 तारखेला जाहीर करणार आहेत. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी दिली आहे. ज्यांच्यासोबत आघाडी केली आहे, तेच आघाडीत राहतील का? माहीत नाही त्यामुळे निवडणुका स्वतंत्र लढाव्यात असाही एक मतप्रवाह असल्याचंही अहिर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान याचपार्श्वभूमीवर सचिन अहिर म्हणाले की, आज पिंपरी-चिंचवडमध्ये देखील सर्व नेत्यांसोबत चर्चा झाली आहे, अर्थात यानंतर 27 तारखेला संपर्क नेत्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका कशा प्रकारे लढायच्या हे 23 तारखेला स्वतःता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर करणार आहेत.

कार्यकर्त्यांमध्ये दोन प्रवाह आहेत की, मविआसोबत लढा आणि दुसर म्हणजे ज्यांच्यासोबत आघाडी करायची तेच आघाडीत राहतील का? हे माहीत नाही त्यामुळे निवडणुका स्वतंत्र लढाव्यात असाही एक मतप्रवाह आहे, यादरम्यान एक बैठक घेऊन यावर निर्णय घेतला जाईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com