Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान प्रकरणातील संशयिताची नोकरी गेली, ठरलेलं लग्नही मोडलं

सैफ अली खान प्रकरणात अटक केलेल्या आकाश कनोजियाची नोकरी गेली आणि ठरलेले लग्न मोडले. दुर्गमधील या तरुणाचे आयुष्य पोलिस कारवाईमुळे उद्ध्वस्त झाले.
Published by :
Team Lokshahi

अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारीला राहत्या घरी चाकूहल्ला झाला होता. या प्रकरणात छत्तीसगडमधील दुर्ग या ठिकाणी राहणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे त्या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. छत्तीसगडमधील 31 वर्षीय तरुण 'आकाश कनोजिया' नावाच्या ड्रायव्हरच्या बाबतीत हे सगळं घडलं आहे.

पोलिसांनी संशयित म्हणून याच तरुणाचे फोटो प्रत्येक रेल्वे स्टेशनवर व्हायरल केले होते. 18 जानेवारीला मिळालेल्या माहितीनुसार, आकाश कनोजियाला दुर्ग स्टेशनवरुन संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या कारवाईनंतर तरुणांची नोकरी तर गेलीच, शिवाय ठरलेलं लग्न देखील मोडलं आहे. या प्रकरणामुळे आकाशच्या कुटुंबाची सर्वत्र बदनामी झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com