व्हिडिओ
Samarjeet Ghatge Join Sharad SP | समरजीत घाटगेंचा राष्ट्रवादी SP पक्षात प्रवेश
समरजीत घाटगेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे असा सामना होण्याची शक्यता आहे.
समरजीत घाटगेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे असा सामना होण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश हा पार पडलेला आहे. लवकरच आणखी एक पक्ष प्रवेश होणार आहे असा समरजीत घाटगे यांनी याठिकाणी दावा केला आहे. कागलच्या भविष्यसाठी पक्ष बदलला असं समरजीत घाटगे म्हणाले.
कागलमधील गैबी चौकामध्ये शरद पवारांचा मेळावा होता आणि याच मेळाव्यातून समरजीत घाटगे जे आतापर्यंत भाजपमध्ये होते त्यांनी आता भाजपाला रामराम ठोकलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचे काही दिवसांपूर्वीच त्यांनी संकेत दिलेले होते. त्यानुसार आज त्यांचा हा पक्षप्रवेश झालेला आहे.