Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांचं वाघ्या श्वानावर 'ते' वक्तव्य; राजकीय नेत्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया
शिवराज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणेच व्हावा अशी मागणी शिवप्रतिष्ठाणचे संभाजी भिडे यांनी केलं आहे. यावेळी " 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत आहे. तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको. या कुत्र्याचं राजकारण करू नये. वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत. याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा".
तसेच पुढे वैष्णवी हगवणे प्रकरणावर बोलताना भिडे म्हणाले की, "हुंडा मागणं देशाला कलंक आहे. हुंड्याची ही पद्धत सर्व बळ वापरून नामशेष केली पाहिजे. पण ते करत असताना राजकारण करता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे". याचपार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांच्या वाघ्या श्वानावर केलेल्या वक्तव्यावर राजकीय नेत्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.